सातारा जम्बो कोव्हीड रुग्णालय हे अतिशय उत्कृष्ट सेवा देणारे कोव्हीड रुग्णालय
सातारा येथे जिल्हा प्रशासनाकडून सुरू केलेले, सातारा जम्बो कोव्हीड रुग्णालय हे अतिशय उत्कृष्ट सेवा देणारे कोव्हीड रुग्णालय असून, इथे सेवा देणारे डॉक्टर्स, नर्स, मदतनीस मावशी - मामा तसेच प्रशासकीय अधिकारी हे कार्यतत्पर असून, इथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची ते काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार करतात. कोव्हीड रुग्णालयामधील व्यवस्थापन ही चांगले आहे.
मी सौ. सुरुची रोहित अहिवळे दिनांक 13 एप्रिल ला कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर चार ते पाच दिवसांनी माझा खोकला वाढला व श्वासाचा त्रास जाणवू लागला, त्यामुळे फलटण येथे एका खाजगी रुग्णालयात मला ॲडमिट केले, परंतु तिथे माझ्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. डॉक्टरांनी माझ्या घरच्यांना, माझी परिस्थिती सांगितली. त्याचवेळी डॉक्टरांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क साधत, माझी (पेशंटची) प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले व सातारा येथे बेड उपलब्ध नसल्याचेही सांगितले. त्यानंतर श्रीमंत संजीवराजे यांनी स्वतः लक्ष घालून, तातडीने सातारा प्रशासनास फोन करून, जंबो कोव्हीड रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून पेशंटची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मला दि. 22 एप्रिल रोजी सातारा जम्बो कोव्हीड रुग्णालयामध्ये ॲडमिट केले. सातारा जम्बो कोव्हीड रुग्णालय येथे आणल्यानंतर माझी अवस्था फारच बिकट झाली होती, परंतु तेथील डॉक्टर्स, नर्स व प्रशासकीय अधिकारी हेमंत भोसले यांनी शर्तीचे प्रयत्न करत माझ्यावर यशस्वी उपचार केले व मला स्टेबल केले. त्यांनतर मी आठ ते नऊ दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतला व नंतर 12 दिवस ऑक्सीजन बेड वर जनरल वॉर्डमध्ये उपचार घेऊन दिनांक 12 मे रोजी मला डिस्चार्ज देण्यात आला.
सातारा जम्बो कोव्हीड रुग्णालयामधील आयसीयू |
सातारा जम्बो कोव्हीड रुग्णालयामधील ट्रीटमेंट आणि सर्व फॅसिलिटी या उत्तम आहेत. नर्सेस ठरलेल्या वेळी येऊन मेडिसिन्स,सलाईन, इंजेक्शन, देऊन जात असतात, दर २ तासांनी ऑक्सीजन सॅच्युरेशन आणि ब्लड प्रेशर चेक करत असतात. त्या नंतर डॉक्टर येऊन ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू आहे का, ते चेक करत असतात. जम्बो कोव्हीड रुग्णालयामध्ये प्रत्येक रुग्णला एक वाफारा (Steamer) आणि Spirometer (lungs exercise साठी) देण्यात आले होते. रोज दुपारी फिजिओथेरपीस्ट physio therapist येऊन व्यायाम exercise घेत असे.
उल्लेखनीय म्हणजे रोज सकाळी ६.३० वाजता स्वच्छ ड्रेस आणि बेडशीट, पिलो कव्हर, चादर, मिळत असे. रोज सकाळी ७ व दुपारी ४ ला चहा, सकाळी ८ ला नाष्टा, दुपारी १२:३० व रात्री ८ वाजता जेवण येत असे. पिण्यासाठी गरम पाण्याची सोय होती. वॉश रूमची सुविधा असून सर्व वॉशरूम मध्ये स्वच्छता होती.
जम्बो कोव्हीड रुग्णालयामध्ये काम करणारा स्टाफ ही तितकाच तत्पर आहे. तेथील मामा - मावशी हे मदतनीस रुग्णांची सेवा आपुलकीने करतात. प्रत्येक वार्डसाठी सेपरेट डॉक्टर्स व नर्सेस यांची नेमणूक असून, ते चोवीस तास तिथे उपलब्ध असतात. त्यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार होण्यास मदत होत असते. एकूणच सातारा जम्बो कोव्हीड रुग्णालय हे एक अतिशय उत्कृष्ट सेवा देणारे कोव्हीड रुग्णालय आहे असे मला वाटते.
No comments