Breaking News

फलटण येथे म्युकरमायकोसिस रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

शस्त्रक्रिया करताना डॉ. जनार्दन पिसाळ
Successful surgery on a patient with myocardial infarction at Phaltan

    फलटण (प्रतिनिधी) - कोरोना नंतर व कोरोनामध्ये म्युकरमायकोसिस  हा आजार होण्याचे प्रमाण खूप वाढू लागले आहे. म्युकरमायकोसिस वरील यशस्वी उपचार पद्धती मध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया व त्यासोबत ॲम्फोटेरिसीन-बी इंजेक्शनची आवश्यकता असते. तरी या म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी लागणारी  हि शस्त्रक्रिया फलटण मध्ये प्रथमच मोरया  हॉस्पिटल येथे दुर्बिणीद्वारे फलटण मधील सुप्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ञ डॉ. जनार्दन पिसाळ यांनी यशस्वीपणे केली आहे.

    ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भूलतज्ञ डॉ. पवन भुजबळ, फिजिशियन डॉ. सौरभ खराडे, डॉ. अमोल घाडगे व डॉ. योगेश गांधी या तज्ञांच्या पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले. फलटणमध्ये म्युकरमायकोसीस रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यासाठी कान, नाक, घसा तज्ञ डॉ. जनार्दन पिसाळ यांनी भूलतज्ञ, फिजिशियन, नेत्ररोग तज्ञ व डेंटल सर्जन यांचे एक पथक तयार केले असून यापुढे या पथकाच्या साहाय्याने म्युकरमायकोसीस  रुग्णावर फलटण येथेच यशस्वी उपचार केले जाणार असल्याचेही डॉ. जनार्दन पिसाळ यांनी सांगितले आहे.

No comments