आईला मारहाण केली म्हणून, दोघा भावांनी सतूराने वार करून केला खून
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - आईला मारहाण केली म्हणून, दोघा भावांनी 35 वर्षीय इसमाच्या डोळ्यात चटणी टाकून, सतूर व लोखंडी पान्याने वार करून, खून केला आहे. याप्रकरणी सस्तेवाडी येथील दोन्ही भावांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापैकी मोठ्या भावास पोलिसांनी त्वरित अटक केली आहे, तर अल्पवयीन भावास ताब्यात घेतले आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १९ मे २०२१ रोजी दुपारी १.१५ वा च्या सुमारास मौजे सस्तेवाडी ता.फलटण गावचे हददीत दातेवस्ती येथे, मृत गणेश हनुमंत सावंत याने अविनाश मल्हारी सावंत यास शेळीचे दुध काढण्यासाठी बोलवले असता, तो आला नाही, या कारणावरून मृत गणेश सावंत याची अविनाश मल्हारी सावंत याच्या आईशी भांडण झाले. याचा राग मनात धरून अविनाश मल्हारी सावंत व विजय मल्हारी सावंत यांनी, गणेश सावंत यांच्या डोळ्यात चटणी टाकून, त्याच्यावर सतुर व पाणी सोडण्याच्या लोखंडी पान्याने वार करुन, त्यास गंभीर दुखापत करून त्याचा खून केला असल्याची फिर्याद कल्पना हणमंत सावंत वय ३७ वर्षे रा. स्वामी समर्थ मंदीराजवळ मलटण ता. फलटण यांनी दिली आहे. त्यानुसार अविनाश मल्हारी सावंत वय २३ वर्ष व विजय मल्हारी सावंत वय १५ वर्षे ११ महिने दोन्ही रा. दातेवस्ती सस्तेवाडी ता.फलटण जि. सातारा यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे असून यापैकी अविनाश मल्हारी सावंत यास पोलिसांनी अटक केली आहे तर विजय मल्हारी सामान ताब्यात घेतले आहे.
अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक ए. ए. सोनावणे करीत आहेत.
सदर गुन्ह्यातील आरोपी यांना गुन्हा घडलेपासुन १ तासाचे आत अजयकुमार बन्सल सो, पोलीस अधीक्षक सातारा. श्री. धीरज पाटील सो, अपर पोलीस अधीक्षक सातारा. श्री तानाजी बरडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण. यांचे मार्गदर्शनाखाली नितीन सावंत पोलीस निरीक्षक, अक्षय सोनावणे सहा पोलीस निरीक्षक, उस्मान शेख, पोलीस उपनिरीक्षक, शिवकुमार जाधव पोलीस उपनिरीक्षक, श्रीमती स्वाती धोंगडे महिला पोलीस उपनिरीक्षक, पो.हवा. दत्तात्रय कदम, पो. हवा. रामदास लिमन, पो. हवा, राजेंद्र फडतरे पो.ना. राजेंद्र गायकवाड, हरिभाऊ धराडे, संजय देशमुख, राजकुमार देवकर, पो. कॉ. सचिन पाटोळे, निखील गायकवाड, गणेश अवघडे यांनी गुन्ह्यातील आरोपी यांची गोपनीय रित्या माहिती घेवुन, गुन्हयाचे कामी ताब्यात घेतले आहे.
No comments