कुरवली बु. येथे यात्रेनिमित्त बोकड कापून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन
फलटण(प्रतिनिधी) - कुरवली बुद्रुक ता. फलटण येथे सातारा जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे यात्रा रद्द असताना देखील बोकड कापून, यात्रा केली असल्याबाबत बरड पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बरड पोलिस औटपोस्ट कडून मिळालेल्या माहितीनुसार , कुरवली बु. गावातील कोरोना समीतीचे अध्यक्ष सरपंच सौ. राणी अंनतकुमार मुळ, ग्रामसेवक लक्ष्मण गावडे, उपसरपंच महेश पवार, व इतर सदस्य यांनी गावातील लोकांना कोरोना रोगाच्या अनुषंगाने गावपातळीवरील यात्रा बंद असल्या बाबत मा. जिल्हाधिकारी साहेब सातारा यांचकडील आदेश आहे असे सांगुन कोणीही यात्रा अगर बोकड कापू नये असे सांगीतले होते.असे असताना ही दि.२१ मे रोजी सकाळी १०.०० वा. सुमारास, कुरवली बुद्रुक ता.फलटण येथे भैरवनाथ देवाची यात्रेच्या अनुशंगाने गावातील विजय ज्ञानदेव मुळ रा. कुरवली बुद्रुक ता. फलटण याने हमीद नजीर मेटकरी याची पत्नी कोरोना पाॅझिटीव्ह आहे. हे माहीत असून त्यास बोलावून त्यांचे मालकीचा बोकड कापून, लोकांची गर्दी बकायदेशीर जमा करून सार्वजनीक ठिकाणी विषाणु संसर्ग व त्याचा प्रादुर्भाव पसरवून मा. जिल्हाधिकारी साहेब सातारा यांचेकडील आदेशाचा भंग करतत कोरोना संसर्ग साथिया रोगाचा प्रसार होऊ शकतो हे माहीत असताना मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले म्हणून तक्रारदार विकास लकडे पोलीस पाटील दत्तनगर कुरवली बुद्रुक यांनी तक्रार दिली आहे.
No comments