कारवाई केली म्हणून आशा सेविकेस हातोडा व लोखंडी गजाने मारहाण
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण, दि.१५ जून - जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी, करण्यात आलेल्या कारवाईचा राग मनात धरून, आशा सेविका यांना लोखंडी गज व हातोड्याने मारहाण करून, गंभीर जखमी केले व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सस्तेवाडी ता. फलटण येथील दोघांच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार सस्तेवाडी ता. फलटण येथे दि. १३ जून २०२१ रोजी दुपारी ४:१५ वाजण्याच्या सुमारास 1) राजेंद्र तुकाराम शेळके 2) सुरज राजेंद्र शेळके दोन्ही रा. सस्तेवाडी ता. फलटण यांनी, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी लावलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केले. दुकान चालु ठेवण्याची दिलेले वेळ संपल्यानंतरही दुकान चालु ठेवले होते म्हणुन, सदर दुकानावर मंडलाधिकारी, कोतवाल तलाठी यांनी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईचा राग मनात धरुन, आशा सेविका सौ. शीतल संतोष शिंदे यांना शिवीगाळ दमदाटी करुन, राजेंद्र शेळके यांनी लोखंडी गजाने आशा सेविका शिंदे यांच्या डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली व त्यांचा मुलगा सुरज शेळके याने लोखंडी हातोडा आशा सेविकेच्या डाव्या हाताच्या पंजावर मारुन दुखापत केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याची फिर्याद सौ. शीतल संतोष शिंदे यांनी दिली आहे. दोन्ही आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस एन जाधव हे करीत आहेत.
No comments