Breaking News

विद्यानागर येथे एकास खोऱ्याने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न

Attempt to kill a person by beating at Vidyanagar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - पूर्वी झालेल्या पाणी भरण्याच्या वादावरून शिवीगाळ करत  लोखंडी पाते व लाकडी दांडके असणाऱ्या खोऱ्याने  विद्यानागर येथील एकाच्या डोक्यात मारहाण करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी विद्यानागर, फलटण येथील विक्रम शिंदे याच्यावर आयपीसी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ जुन २०२१ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास गणेश अपार्टमेंट विद्या नगर फलटण येथे, अमेय प्रवीण खलीपे  रा. गणेश अपार्टमेंट, विद्यानगर फलटण यांचा मामा महेश बबन नखाते रा. गणेश अपार्टमेंट विद्यानगर फलटण हे  ऑफिसचे काम आटपून थांबले असता, पूर्वी झालेल्या पाणी भरण्याच्या वादावरून आरोपी विक्रम चंद्रकांत शिंदे रा. गणेश अपार्टमेंट फलटण याने शिवीगाळ करत कुऱ्हाड घेऊन  अंगावर धावून गेला, तेवढ्यात त्याची कुऱ्हाड त्याच्या आईने काढून घेतली. नंतर तेथेच पडलेल्या लोखंडी पात्याचे व लाकडी दांडके असणाऱ्या खोऱ्याने आरोपी विक्रम शिंदे याने महेश बबन नखाते यांच्या डोक्यात वरील बाजूस जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद अमेय प्रवीण खलीपे यांनी दिली आहे.  

No comments