14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेऊ नये : सहाय्यक कामगार आयुक्त
सातारा : सर्व दुकाने, आस्थापना, कारखाने, चित्रपटगृहे, गॅरेज इतर सर्व आस्थापनांमध्ये 14 वर्षाखालील मुले कामासाठी ठेवू नये. 14 वर्षाखालील मुले कोणत्याही आस्थापनांमध्ये कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणत्याही आस्थापनेने 14 वर्षाखालील मुले कामावर ठेवू नये. असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त चेतन जगताप यांनी केले आहे.
No comments