मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे - तहसीलदार समीर यादव
Citizens should co-operate in voter list purification program - Tehsildar Sameer Yadav
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण (अनुसूचित जाती) विधानसभा मतदार संघामध्ये मतदार यादीतील फोटो नसलेले व दुबार मतदारांची नावे वगळण्याबाबत मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रमांतर्गत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार फलटण समीर यादव यांनी केले आहे.
फलटण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३ लाख ३६ हजार ८३ इतके मतदार असून त्यापैकी फोटो नसालेले मतदारांची संख्या ३ हजार २०७ व दुबार मतदारांची संख्या ७७६ इतकी आहे. तरी मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रमांतर्गत संबंधित मतदान केंद्रावर नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे मार्फत फोटो नसलेले मातदारांचे फोटो गोळा करणे, मतदार मयत अथवा स्थलांतरित असल्यास त्यांची पडताळणी करून नमूना ७ भरून घेणे तसेच दुबार मतदार असल्यास मतदारांची घर भेटी घेवून, चौकशी करून मतदारास नको असलेल्या ठिकाणचे मतदार यादीतील नाव वगळणेबाबत नमूना नं. ७ भरून घेणेचे कामकाज चालु आहे.
तरी मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांनी आपले भाग क्रमांकमधील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे ३० जून २०२१ पर्यत फोटो जमा करावेत, विहीत मुदतीत फोटो जमा न झालेस संबंधित मतदाराची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच मतदार यादीतील दुबार नाव वगळणे बाबत नमूना नं. ७ भरून देऊन मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रमांतर्गत प्रशासनास सहकार्य करावे असे अवाहन तहसिलदार फलटण समीर यादव यांनी केले आहे.
No comments