प्रभाग क्रमांक ११ मधील पिरॅमिड चौक ते पद्मावती नगर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
![]() |
रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर समवेत नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, ॲड.मधुबाला भोसले व इतर मान्यवर |
Commencement of work on the road from Pyramid Chowk to Padmavati Nagar in Ward No.11
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील पिरॅमिड चौक ते पद्मावती नगर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाला.
पिरॅमिड चौक ते पद्मावती नगर या रस्त्याकरीता फलटण नगर परिषदेच्या विशेष रस्ता अनुदानांतर्गत १ कोटि ११ लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला असून फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे व प्रभाग क्र.११ च्या नगरसेविका ॲड. सौ मधुबाला भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्णत्वास जात असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी याप्रसंगी सांगितले.
ॲड.सौ.मधुबाला भोसले याप्रसंगी म्हणाल्या विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे हे काम होत असून या बरोबर प्रभाग क्र.११ मधील उर्वरित रस्त्यांची कामे ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
कार्यक्रमास फलटण नगरपरिषदेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर , नगरसेविका सौ. प्रगती कापसे, सौ ज्योत्स्ना शिरतोडे ,श्रीमती रंजना कुंभार ,सौ सुवर्णा खानविलकर, सौ.दिपाली निंबाळकर, सौ. वैशाली चोरमले तसेच नगरसेवक अजय माळवे , बाळासाहेब मेटकरी, किशोरसिंह नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी संजय गायकवाड साहेब अभियंता साठे साहेब, महाराजा मल्टी स्टेट चे चेअरमन रणजितसिंह भोसले, संचालिका सौ. मृणालिनी भोसले, प्रभागातील नागरिक व पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड .मधुबाला भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रदिप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांनी आभार मानले.
No comments