सुर नवा ध्यास नवा च्या उपविजेत्या राधा खुडे यांचे संभाजी ब्रिगेड कडून अभिनंदन
फलटण गंधवार्ता वृत्तसेवा - कलर्स मराठी या टीव्ही चॅनेलवर, सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात वालचंदनगर येथील कु. राधा खुडे यांनी आपल्या आवाजाची जादू दाखवत यश संपादन केले. सुर नवा ध्यास नवा कार्यक्रमात तिने गायलेली खंडोबाची कारभारीन झाली बाणू धनगरीन, हलगी वाजती, चांदणं चांदणं झाली रात एकविरेची पाहत होते वाट, बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी, तुझ्या उसाला लागलं कोल्हा, तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला, मेरे रश्के कमर...ही गाणी लोकप्रिय झाली असून राधाच्या आवाजाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. सुर नवा ध्यास नवा या गायन स्पर्धेत राधा खुडे यांनी तिसरा क्रमांक मिळवला, या यशाबद्दल संभाजी ब्रिगेड सातारा यांच्या वतीने राधा खुडे यांचे, फेटा बांधून, पुष्पगुच्छ व पोट्रेट भेट देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, सचिन अभंग, प्रशांत भुजबळ, गणेश मोहिते, बजरंग भगत, गणेश पखाले,वैभव अभंग हे उपस्थित होते.
No comments