फलटण तालुक्यात 80 तर सातारा जिल्ह्यात 833 कोरोना बाधित ; 28 बाधितांचा मृत्यू
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 12 जून 2021 - फलटण तालुक्याची कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 80 आली आहे. यामध्ये आर.टी.पी.सी.आर. 42 व आर.ए.टी. 38 चाचण्यांचा समावेश आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून आज जाहीर करण्यात आलेली फलटण तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या 62 आहे.
आज मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 80 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 2 तर ग्रामीण भागात साखरवाडी 8, गिरवी 8, खराडेवाडी 5, राजाळे 5, ठाकुरकी 3, बरड 5, कुसुर 4, पिंपरद 3, विडणी 2, वाघोशी 1,वडजल 3, तोंडले 1, बिजवडी ता माण 2, खामगाव 1, खटकेवस्ती 2, विठ्ठलवाडी 1, निंबळक 3, पवारवाडी 3, रावडी बु 1, दुधेबावी 2, तरडगाव 4, तडवळे 1, टाकूबाईचीवाडी 2,आदर्की खू 3, पळमखेडा ता बुलढाणा 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
सातारा जिल्ह्यात 833 कोरोनाबाधित; 28 बाधितांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 833 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 28 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 38 (8043), कराड 161 (24466), खंडाळा 21 (11190), खटाव 78 (17971), कोरेगांव 114 (15627), माण 50 (12285), महाबळेश्वर 4 (4158), पाटण 57 (7624), फलटण 62 (27468), सातारा 208 (37653), वाई 31 (12098) व इतर 9 (1168) असे आज अखेर एकूण 179751 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 1 (183), कराड 9 (717), खंडाळा 0(143), खटाव 2 (445), कोरेगांव 2 (354), माण 3 (243), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (171), फलटण 2 (272), सातारा 6 (1141), वाई 1 (319) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4032 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
No comments