श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध व अपंग व्यक्तींना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप
अन्नधान्याचे किट वाटप करताना मान्यवर |
Distribution of essential items to blind and disabled persons on the occasion of Raghunath Raje's birthday
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण चे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त 25 अंध व अपंग व्यक्तींना अन्नधान्याचे किटचे वाटप सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अहिवळे व मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य नागरिकांसह अंध व अपंग व्यक्तींची परिस्थिती अडचणीची झाली आहे. याची जाणीव ठेवत प्रशांत अहिवळे यांनी मंगळवार पेठेतील 25 अपंग व्यक्तींना अन्नधान्याचे किट्स व युवकांना टी शर्टसचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रा. रमेश आढाव, मराठा महासंघाचे अध्यक्ष मराठा महासंघाचे अध्यक्ष नानासाहेब पवार, रिपाई चे सातारा जिल्हा सचिव विजय येवले, रिपाई सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा, रिपाई तालुका अध्यक्ष संजय निकाळजे, रिपाई फलटण तालुका उपाध्यक्ष सतीश अहिवळे, सातारा जिल्हा अपंग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश कांबळे, दीक्षा दिव्यांग स्वयंसाहाय्यता बचत गटाचे सचिव संतोष काकडे, पत्रकार सचिन मोरे, गोविंद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अन्नधान्याचे किट वाटप प्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता |
No comments