Breaking News

हवामान आधारीत फळपीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे

Farmers should take advantage of weather based fruit crop insurance scheme  - District Superintendent of Agriculture Gurudatta Kale

     सातारा  (जिमाका): कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपीकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपीकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळपीकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्यामध्ये हवामान आधारीत फळपीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले आहे.

     जिल्ह्यासाठी सन 2021-22 मधील मृग बहरातील डाळींब पीकाचा समावेश या योजनेत केला असून अंबिया बहरातील आंबा, डाळींब, द्राक्ष, केळी व स्ट्रॉबेरी पीकाचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चालू हंगामापासून पाटण तालुक्यातील आंबा पीकाचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.

    ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छिक स्वरुपाची करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी अत्यल्प विमा हप्ता रक्कम भरावयाची असून उर्वरीत विमा हप्ता शासन भरणार आहे. अधिक माहितीसाठी गावपातळीवरील तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. काळे यांनी केले आहे.

No comments