बनावट कागदपत्रे तयार करून कोळकी येथील ९.४६ आर जमीन कब्जात घेऊन केली विक्री
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. १२ जून - वडीलांचे व आजीचे खोटे व बनावट मृत्यु प्रमाणपत्र व खोटे व बनावट कागदपत्र तयार करुन वडीलांचे नावावर असलेली मौजे कोळकी येथील ०९.४६ आर क्षेत्र जमीन स्वतःचे नावाने करुन घेतली व नंतर त्या जमिनीची विक्री केल्या प्रकरणी फलटण मधील एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ मार्च २०२१ रोजी तलाठी ऑफिस कोळकी ता. फलटण येथे विकास बबन राऊत बुधवार पेठ फलटण यांनी फिर्यादी अक्षय अरविंद राऊत रा.बुधवार पेठ फलटण यांच्या वडीलांचे व आजीचे खोटे व बनावट मृत्यु प्रमाणपत्र व खोटे व बनावट कागदपत्र तयार करुन, त्या अनुषंगाने खोटे प्रतिज्ञापत्र तयार करुन, फिर्यादीचे वडीलांच्या नावावर असलेली, मौजे कोळकी येथील अक्षतपार्क जवळील गट नं ३७/३ मधील ०९.४६ आर क्षेत्र ही जमीन (प्लॉट) तलाठी कार्यालय येथे अर्जा सोबत दाखल करुन, स्वतःचे नावाने करुन घेतली व ती पुढे इसम नामे प्रविण हणुमंत सत्रे यांना साठे खताने तसेच खरेदी दस्त क्रमांक ५०२/२१ ने व इसम नामे मुन्ना जैनुद्दीन शेख यांना साठे खत व दस्त क्रमांक ५०३/२१ ने विक्री करुन फसवणुक केल्याची फिर्याद अक्षय अरविंद राऊत यांनी दिली आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ हे करीत आहेत.
No comments