Breaking News

काही लोकांच्या चुकांमुळे लॉकडाऊन मध्ये वाढ झाल्याने व्यापारी व नागरिकांवर अन्याय - अनुप शहा

 Injustice on traders and citizens due to increase in lockdown due to mistakes of some people - Anup Shah

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि.१२ जून -  फलटण तालुक्यात काही लोकांच्या चुकांमुळे लॉकडाऊन वाढला असुन, यामुळे व्यापार्‍यांवर व सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असुन सोमवार पासुन प्रशासनाने जर हा अन्याय दुर केला नाही तर जन आंदोलन उभारावे लागेल असा इशारा नगरसेवक अनुप शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे दिलेला आहे.

    फलटण तालुक्यातील काही डॉक्टर्स, लॅब चालक व प्रांत कार्यालयामधील चुकीच्या कारभारामुळे फलटण मधील कोरोना पेशंटच्या आकड्याचा घोळ झाला असुन, त्यामुळे फलटण तालुक्यातील लॉकडाऊन वाढवले जात आहे. यामध्ये सर्व सामान्य नागरिक, छोटे व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेषतः व्यापार्‍यांची बाजु ऐकुन न घेता त्यांना गुन्हेगारा सारखे वागणुक प्रशासन देत आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. यासर्व गोष्टीत सुधारणा करून, सोमवार पासुन सर्व व्यवहार सुरळीत करून दुकाने सुरू करण्यास व्यापार्‍यांना परवानगी न दिल्यास, जन आंदोलन करण्यात येईल याची गंभीर नोंद प्रशासनाने घ्यावी. अन्यथा होणार्‍या पुढील सर्व गोष्टींना प्रशासन जबाबदार राहील असेही पत्रकात अनुप शहा यांनी म्हटले आहे.

No comments