घरातील महिलेस शिवीगाळ व दमदाटी केली म्हणून सासकल येथील एकास लाकूड व लोखंडी गजाने मारहाण
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि.१२ जून - घरातील महिलेस शिवीगाळ व दमदाटी का केलीस, असे म्हणून सासकल येथील एकास चौघा जणांनी लोखंडी गजाने व लाकडी दांडक्याने तसेच हाताने लाथ बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सासकल येथील दोघे व इतर दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि 12/06/2021 रोजी रात्री 12.30 वा. चे सुमारास मौजे सासकल ता. फलटण गावच्या हद्दीत फिर्यादी सागर गजानन खुडे वय 28 सासकल यांच्या घराच्या शेजारी राहणारा चुलता जयसिंग गणपत खुडे व सोमनाथ बंडू खुडे व त्यांचे दोन अनोळखी साथीदार असे फिर्यादीच्या घरी आले , व वनिता हीस शिवीगाळ दमदाटी का केली, असे म्हणून चिडून जाऊन सोमनाथ बंडू खुडे याने लोखंडी गजाने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली, तसेच जयसिंग गणपत खुडे याने लाकडी दांडक्याने मारहाण केली, तसेच अनोळखी दोन इसमांनी फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याची तक्रार सागर खुडे यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार शेळके हे करीत आहेत.
No comments