केंद्र शासनाच्या स्टॅण्ड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांकरीता मार्जिन मनी योजना
सातारा (जिमाका): सामाजिक न्याय विभागातर्फे केंद्र शासनाच्या स्टॅण्ड अप इंडिया योजनेत अनुसुचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना कार्यान्वीत झालेली आहे. या योजनेंतर्गत सन 2020-21 मध्ये एकूण 12 अर्ज सातारा जिल्ह्यामध्ये प्राप्त झाले होते. त्यापैकी परिपुर्ण 10 अर्ज मंजूर झालेले आहे.
केंद्र शासनाच्या स्टॅण्ड अप इंडिया योजनेंतर्गत उद्योग करु इच्छिणाऱ्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजकांना भराव्या लागणऱ्या 25 टक्के हिस्साच्या रकमेपैकी 15 टक्के रक्कम सामाजिक न्याय विभागामार्फत मार्जिन मनी म्हणुन देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नव उद्योजकांना केवळ 10 टेक्क स्वहिस्सा भरावा लागणार आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजकांनी मार्जिन मनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नितीन उबाळे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सातारा. यांनी केले आहे.
No comments