Breaking News

महानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार

Memorandum of Understanding between Mahanand and Gokul for co-packing of Gokul milk

    मुंबई - : महानंद आणि गोकुळ यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळात सामंजस्य करार झाल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाच्या सहकार धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

    मंत्रालयात पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री यांच्या दालनात हा करार करण्यात आला. या कराराप्रसंगी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृह(शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई ( महानंद ) या संस्थेचा सभासद संघ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ ) यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकींग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळ बैठकीत सामंजस्याने निर्णय झाला आहे.

    कोल्हापूर जि. सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादितचे (गोकुळ) अध्यक्ष विश्वास पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या., मुंबई (महानंद)अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, गोकुळचे संचालक अरूण डोंगर, राधानगरी बँकेचे अध्यक्ष अभिषेक डोंगर, महानंदचे उपाध्यक्ष डी.के.पवार, व्यवस्थापकीय संचालक शामसुंदर पाटील, गोकुळचे श्री घुणेकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

No comments