जमीन वाटपावरून मित्राला त्रास देतो म्हणून सासकल येथील एकास लाकूड व गजाने मारहाण
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि.१२ जून - जमीन वाटपावरून तू माझ्या मित्राला का त्रास देतो, असे म्हणून सासकल येथील युवकास तिघाजणांनी मिळून लाकडाने, गजाने मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी सासकल येथील दोन भाऊ व एक अनोळखी इसमा विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ जून २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मौजे सासकल ता.फलटण गावचे हद्दीत, फिर्यादी सचिन जयसिंग खुडे वय 19 रा. सासकल हे त्यांच्या घरासमोर गुरांना खायला घालत होते. त्यावेळी त्यांचे जवळ त्यांचा चुलत भाऊ सागर गजानन खुडे, आकाश गजानन खुडे व त्यांचे सोबतचा अनोळखी मुलगा असे आले व त्यातील अनोळखी मुलगा फिर्यादिस म्हणाला की व तुझे घरातील लोक, माझे मित्र सागर खुडे व आकाश खुडे यांना, तुमचे जमीन वाटपावरुन सारखा त्रास देता तुझेकडे बघतोच आता, असे म्हणुन त्याने तेथे जवळ असलेले लाकुड हातात घेवुन फिर्यादीच्या पाठीवर हाणुन शिवीगाळ दमदाटी करु लागले व गजाने मारहाण केली केली असल्याची फिर्याद सचिन जयसिंग खुडे यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार पी.ए. खाडे करीत आहेत.
No comments