Breaking News

फलटण शहर व तालुक्यातील टेलरिंग लघु उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी

Permission should be given to continue tailoring small scale industries in Phaltan city and taluka

    फलटण (प्रतिनिधी) : टेलरिंग हा लघु उद्योग असून कोरोना लॉक डाऊन मध्ये शासनाने लघु उद्योगांना व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली असताना स्थानिक प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांमुळे सातारा जिल्ह्यात हा लघु व्यवसाय बंद राहिल्याने आमचे अतोनात नुकसान झाले आहे, तरीही स्थानिक प्रशासनाचे निर्बंध स्विकारुन गेले सव्वा वर्ष आम्ही नुकसान सोसले आता ते शक्य नसल्याने परवानगी द्यावी अशी मागणी फलटण शहर व तालुक्यातील टेलरिंग व्यवसाईकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देताना टेलरिंग व्यावसाईक

    शहर व तालुक्यातील टेलरिंग व्यावसाईकांनी वरीलप्रमाणे तयार केलेले शहर व तालुक्यातील टेलरिंग व्यावसाईकांच्या सह्या असलेले निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले असून आपले लघु व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.

    विवाह समारंभात नवे कपडे ही प्राधान्यक्रम असलेली बाब असून लॉक डाऊन शिथील होत असताना प्रशासनाने मर्यादित लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभास परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले असताना टेलरिंग व्यवसायावरील निर्बंध कायम असल्याने वधू-वर आणि कुटुंबियांना नवे कपडे शिवून मिळत नाहीत, दुकाने बंद असल्याने रेडिमेड ड्रेस मिळत नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे, त्याचबरोबर आमचे उत्पन्न नाहक बुडत आहे याचा विचार व्हावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    आमचे व्यवसाय बंद असले तरी जागा भाडे, लाईट बिल, कामगार पगार, नगर परिषद कर वगैरे बाबी चुकणार नाहीत, त्याचबरोबर आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अन्य व्यवस्था नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याचे, काहींवर येण्याची शक्यता असल्याने आम्हा टेलरिंग व्यवसाईकांना आमचे लघु उद्योग सुरु करण्यास परवानगी द्यावी

पोलिस स्टेशन येथे तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देताना टेलरिंग व्यावसाईक

    अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यास मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग यासह सर्व नियम निकष सांभाळून आपण द्याल त्या वेळेत आमचे लघु उद्योग सुरु ठेवण्यास आम्ही बांधील राहु याची ग्वाही निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

No comments