सातारा वैद्यकीय महाविद्यालय ; इमारती पुर्ण होई पर्यंत पानमळेवाडी येथे सुरु होणार
सातारा (जिमाका): वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती पुर्ण होई पर्यंत सध्या तात्पुरत्या स्वरूपात पानमळेवाडी येथील सावकार कॉलेज याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. या महाविद्यालयाची पहाणी आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.
या पहाणी प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, महाविद्यलायाचे डीन डॉ. संजय गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी महाविद्यालयातील हॉल, प्रयोग शाळा, ग्रंथालय, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, स्टाफ रुमची पहाणी करुन आवश्यक त्या सूचना केल्या.
No comments