सरडे येथे बीजप्रक्रिया मोहिम व १० टक्के रासायनिक खतांची बचत मोहीम कार्यक्रम
सरडे येथे बीजप्रक्रिया मोहिमेत प्रात्यक्षिक दाखवताना |
फलटण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासन कृषि विभाग व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली मुबई ,व बायर सायन्स ली यांच्या संयुक्त विद्यमाने सरडे ता. फलटण जिल्हा सातारा येते खरीप हंगाम बीजप्रक्रिया मोहिम व १० टक्के रासायनिक खतांची बचत मोहीम अंतर्गत संजय पवार यांच्या शेतावर कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी श्री सचिन जाधव यांनी बीजप्रक्रिया चे महत्व व १० टक्के रासायनिक खता मध्ये बचत व कृषिक अँप च्या माध्यमातून रासायनीक खताची मात्रा देण्याचे तंत्रज्ञान बाबत मार्गदर्शन केले व बीजप्रक्रिया मुळे पिकाचे वाढ जोमदार व निरोगी रहाण्यास मदत होऊन ,पीक उत्पादन मध्ये वाढ होऊन,पिकाचे उत्पन्न वाढणार असल्याचे व खत बचत मोहीम बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन कृषी सहाय्यक श्री सचिन जाधव यांनी केले.
श्री महादेव वीरकर उपसरपंच सरडे ता. फलटण यांनी कृषि विभागा मार्फत राबविण्यात आलेले बीजप्रक्रिया मोहीम व १० टक्के रासायनिक खतांची बचत मोहीम स्तुत्य उपक्रम असून शेतकऱ्यांनचे पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार असल्याचे यावेळी महादेव वीरकर उपसरपंच सरडे यांनी सांगितले.
प्रगतशील शेतकरी संजय पवार यांनी बाजरी बियाण्यास बीजप्रक्रिया व खतमात्रा मध्ये बचत यामुळे पिकाच्या उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार असल्याचे व सॊयबिन , मका , तूर, या संपूर्ण पिकाच्या बियाण्यास बीजप्रक्रिया करूनच पेरणी करणार असल्याचे यावेळी श्री संजय पवार यांनी सांगितले.
यावेळी बाजरी पिकाच्या बियाण्यास रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया ड्रम मध्ये करण्यात आले. संपूर्ण बियाण्यास व्यवस्थित प्रक्रिया ड्रम होते.
कृषि सहसंचालक कोल्हापूर उमेश पाटील , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सातारा गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषि अधिकारी फलटण भास्करराव कोळेकर, तालुका कृषि अधिकारी फलटण सुहास रणसिंग ,मंडल कृषि अधिकारी बरड भरत रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली खरीप हंगाम मोहीम सुरू आहे.
कार्यक्रमास उपसरपंच सरडे महादेव वीरकर , ग्रामस्तरीय कृषि समिती सदस्य सरडे श गोपीनाथ वाघमोडे,कृषि पर्यवेक्षक बरड श्री मल्हारी नाळे,कृषि सहाय्यक श्री सोमनाथ पवार ,शेतकरी श्री मारुती चव्हाण, श्री गजानन बेलदार व बायर सायन्स प्रतिनिधी अभिजित ढगे, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली मुबई प्रतिनिधी श्री ओंकार रणवरे ,कृषि सहाय्यक राजाळे सचिन जाधव व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
No comments