चिंताजनक! फलटण तालुक्यात 138 कोरोना बाधित ; सर्वाधिक खामगाव 10
138 corona affected in Phaltan taluka; Most Khamgaon 10
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 20 जुलै 2021 - आज दि. 20 जुलै 2021 रोजी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 138 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये शहरात 6 व्यक्ती तर ग्रामीण भागात 132 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक खामगाव येथे 10 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर आज कोरोना बधितांच्या संख्येने पुन्हा एकदा शंभरी पार करून 138 आकडा गाठला आहे. कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब चिंताजनक आहे. नागरिकांनी सावधान झाले पाहिजे. आणि कंपल्सरी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
आज दि. 20 जुलै 2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 138 बाधित आहेत. 138 बाधित चाचण्यांमध्ये 69 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 69 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 6 तर ग्रामीण भागात 132 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात खामगाव 10, सुरवडी 9, पाडेगाव 8, वाठार निंबाळकर 8, तरडगाव 7, निंबळक 6, होळ 6, खड़की 2, बरड 1, कापशी (मोटेवाडी) 1, कोळकी 4, जाधववाडी 4, सोमंथळी 5, साखरवाडी 4, विडणी 5, मुळीकवाडी 1, हिंगणगाव 1, भिलकटी 1, निरगुडी 2, गिरवी 1, फडतरवाडी 1, रावडी खुर्द 3, राजाळे 1, राजुरी 2, सस्तेवाडी 2, चौधरवाडी 2, तडवळे 1, घाडगेमळा 1, गोखळी 2, धुळदेव 2, ढवळ 1, कोरेगाव 2, मिरगाव 1, शिंदेवाडी 1, विठ्ठलवाडी 1, फरांदवाडी 1, सरडे 1, डोंबाळवाडी 1, दुधेबाबी 1, वाखरी 2, वडले 2, तावडी 2, सांगवी 1, धामणी ता माण 1, परतवाडी ता माण 1, गाडेवाडी ता माण 3, वडगाव ता माण 1, नातेपुते ता माळशिरस 2, मालगाव ता सातारा 3, कामठे चिपळुण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments