Breaking News

३४ बेवारस वाहने ; फलटण पोलिस स्टेशनला कागदपत्रे दाखवून मालकांनी वाहने घेऊन जावीत

34 unattended vehicles; Owners should take the vehicles by showing the documents to Phaltan police station

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहर पोलीस ठाणे जिल्हा सातारा येथे २३ दुचाकी, ७ तीनचाकी व ४ चारचाकी अशी एकूण ३४ बेवारस वाहने उभी आहेत. सदरचे वाहनांबाबत अद्याप कोणीही मालकी हक्क सिध्द केलेला नाही. खाली दिलेल्या यादीतील दुचाकी व तीन, चार चाकी वाहनांच्या उपलब्ध माहीतीप्रमाणे कोणाचे वाहन असल्यास त्यांनी, फलटण शहर पोलीस ठाणे जिल्हा सातारा येथे मुळ कागदपत्रासह हजर राहुन, आपले वाहन दिनांक ३१/०७/२०२१ रोजी पर्यंत ताब्यात घेवून जावे.  त्यानंतर कोणीही खालील बेवारस दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहना बाबत हक्क दाखविल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. व नमुद बेवारस दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचा स्क्रॅप म्हणुन कायदेशीर लिलाव केला जाईल.

     तरी संबधीतानी आवश्यक कागदपत्रासह तात्काळ फलटण शहर पोलीस ठाणे येथे हजर रहावे, असे अवाहन श्री. भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे जिल्हा सातारा यांनी केले आहे.
बेवारस वाहनांची यादी

No comments