Breaking News

फलटण तालुक्यात 94 कोरोना बाधित ; सर्वाधिक तरडगाव 8

94 corona affected in Phaltan taluka; Most Tardgaon 8

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 18 जुलै 2021  - काल दि. 17 जुलै 2021 रोजी  जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये शहरात 6  व्यक्ती तर ग्रामीण भागात 88 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक तरडगाव येथे 8 रुग्ण सापडले आहेत.  

    काल दि. 17 जुलै  2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 94 बाधित आहेत. 94 बाधित चाचण्यांमध्ये 40 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 54 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 6 तर ग्रामीण भागात 88 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात तरडगाव 8, साखरवाडी 6, शिंदेवाडी 6, निंबळक 6,  राजुरी 5, कोळकी 5, सोमंथळी 5,  विडणी 5, खराडेवाडी 1, खामगाव 1, खडकी 1, कापशी 1, शिंदेनगर 1,  तिरकवाडी 1, निरगुडी 1, गिरवी 3,  होळ 3, राजाळे 2,  वाखरी 1, वाठार निंबाळकर 2, चौधरवाडी 1, जावली 1, आदर्की खु 1, गुणवरे 1, आमलेवाडी ता माण 1, मुरुम ता बारामती 1, काशिदवाडी 1, कापडगाव 1, माळेवाडी 2, मिरढे 2, हणमंतवाडी 1, पाडेगाव 1, सांगवी 4, सासवड 4, नाईकबोमवाडी 1, धर्मपुरी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments