जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांना मातृशोक
फलटण (प्रतिनिधी) - जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या मातोश्री श्रीमती स्नेहलता शांतीलाल मेहता वय-९४ यांचे वृद्धापकाळाने नारळीबाग, फलटण येथील राहत्याघरी शुक्रवारी दि २४ रोजी रात्री निधन झाले. आज शनिवार रोजी दुपारी 3.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमी फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे
अंत्यविधीस हभप बंडातात्या कराडकर,आमदार दीपक चव्हाण,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे,महानंद चे व्हा चेअरमन डी के पवार, ऍड नरसिंह निकम,उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे,नगराध्यक्षा सौ नीता नेवासे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय,सामाजिक,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
No comments