अग्नीपंख फौंडेशनने, श्रीगोंदा ते फलटण सायकल वारी करून प्रवीण जाधवच्या आई वडीलांना केला सलाम
Agnipankh Foundation rides a bicycle from Shrigonda to Phaltan and salutes Praveen Jadhav's parents
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ जुलै - श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने बेलवंडी (ता. श्रीगोंदा ) ते सरडे ( ता. फलटण) ९२ किलोमीटरची सायकल वारी करुन टोकियो मध्ये सुरु असलेल्या ऑलम्पिक मध्ये मध्ये तिरंदाजीत उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या प्रविण जाधव यांच्या आई वडीलांना सलाम केला. आणि प्रविणचे सुवर्ण पदकाचे स्वप्न साकार होण्यासाठी सामूहिक प्रार्थना केली.
कठोर परिस्थितीवर मात करून प्रविण जाधव सारखे खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची लयलूट करण्यासाठी बाजी लावत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अग्नीपंख फौंडेशनने 'श्रीगोंदेकरांची प्रेरणा सायकल वारी ऑलिम्पिकवीरांच्या मंदीरी' हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. शुभेच्छा! - ललीता बाबर, आंतरराष्ट्रीय धावपटू
राष्ट्रगीत आणि आनंदाश्रूया दुर्लक्षित जिगरबाज खेळाडूच्या घरकुलासमोर तिरंगा ध्वजाला साक्ष ठेवत राष्ट्रगीताची धुन वाजली, या वेळी या माता पित्याच्या आणि सरडेकरांच्या चेहऱ्यावरील आनंद अविस्मरणीय होता.
No comments