Breaking News

आजाद समाज पार्टीची युथ फलटण तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर

Azad Samaj Party's Youth Phaltan taluka and city executive announced

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  आजाद समाज पार्टी,राष्ट्रीय अध्यक्ष मा.अॅड चंद्रशेखरभाई आझाद, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुलभाऊ प्रधान यांच्या आदेशाने आजाद समाज पार्टी,फलटण तालुका व शहर युथ नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणीच्या फलटण तालुका युथ अध्यक्षपदी विनोद विठ्ठल लोखंडे व युथ फलटण शहर अध्यक्षपदी अक्षय बापट लोंढे यांची निवड करण्यात आली.

    पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सनी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली फलटण येथे झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र मंगेश आवळे, अध्यक्ष सातारा जिल्हा अतिशभाऊ कांबळे, उपाध्यक्ष सातारा जिल्हा महादेव (आप्पा) गायकवाड, फलटण तालुका अध्यक्ष मनोजभाऊ आढाव, फलटण शहर अध्यक्ष योगेश माने आदी उपस्थित होते.

    आजाद समाज पार्टीच्या फलटण तालुका व शहर युथ नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असुन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.यामध्ये युथ सातारा जिल्हा अध्यक्ष सुरज युवराज भोसले, युथ फलटण तालुका अध्यक्ष विनोद विठ्ठल लोखंडे, युथ फलटण शहर अध्यक्ष अक्षय बाबट लोंढे, युथ फलटण तालुका उपाध्यक्ष अक्षय धनाजी भोसले, पवन प्रकाश जाधव,शुभम बंडू गायकवाड,अभिजित प्रकाश कांबळे, युथ फलटण तालुका सचिव चैतन्य शिवाजी साळवे,युथ फलटण तालुका कार्याध्यक्ष अभि विजय आवारे,युथ फलटण तालुकासंपर्क प्रमुख रोहित सुरेश जगताप,युथ फलटण तालुका संघटक सत्यजित विजयकुमार खरात,युथ फलटण शहर उपाध्यक्ष  विकी बोके, कुदंन शिवाजी जाधव राकेश पवार, युथ फलटण शहर  कार्याध्यक्ष तानाजी रणदिवे,युथ फलटण शहर संघटन शुभम जाधव यांच्या निवडी करण्यात आल्या.

No comments