Breaking News

सांगावी येथे मटका जुगार चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल


A case has been registered against a Matka gambler at Sangavi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सांगवी ता. फलटण येथे बेकायदा बिगर परवाना लोकांकडुन पैसे स्विकारून, कल्याण मटका जुगार चालवित असणाऱ्या, सांगवी येथील तानाजी नाना घोलप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ जुलै २०२१ रोजी सायं ५.४० वाजण्याच्या सुमारास मौजे सांगवी ता. फलटण गावचे हददीत, निरा नदी पुलाजवळ स्मशानभूमीच्या कटयावर तानाजी नाना घोलप रा. सांगवी ता. फलटण हे, लोकांच्याकडुन पैसे स्विकारून, स्वतःच्या फायदयाकरीता, बेकायदा बिगर परवाना  कल्याण नावाचा मटका जुगार चालवीत असताना, मिळुन आले असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ६१० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य सापडले आहे.

    अधिक तपास पोलीस हवालदार ए. एस. कर्णे करीत आहेत.

No comments