Breaking News

फलटण तालुक्यातील 20 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन

Containment zones in 20 villages of Phaltan taluka

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, फलटणचे प्रांताधिकारी तथा इन्सिडेंट ऑफिसर शिवाजीराव जगताप यांनी फलटण तालुक्यातील २० गावांमध्ये कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केलेली आहेत.

    फलटण तालुक्यातील कोळकी, तरडगाव, आरडगाव, राजुरी, साखरवाडी, कापडगाव, निंबळक, सांगवी, पाडेगाव, कुसुर, फरांदवाडी, राजाळे, ताथवडा, गिरवी, तावडी, कोरेगाव, दुधेबावी, जाधववाडी ही गावे १३ जुलै २०२१ ते २६ जुलै २०२१ पर्यत प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत. या गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कटेंटमेंट झोन प्रमाणे नियम लागू राहणार आहेत. आरोग्य विषयक सेवा सोडून सर्व सेवा बंद राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले.

No comments