जिंती येथे कृषीदूताने केले कोरोना लसीकरण जनजागृती व शेती विषयक मार्गदर्शन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या काॅलेज ऑफ ॲग्रीकल्चर भानसहिवरे (ता. नेवासा) येथिल विद्यार्थी कृषीदूत कुणाल सुरेश अडागळे यांनी जिंती तालुका फलटण येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव 2021-22 च्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या अभ्यास दौऱ्यात शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन करून कोविड लसीकरण जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषीदूत कुणाल सुरेश अडागळे यांनी, कोरोना सन स्वर्गातील घ्यावयाची दक्षता व उपाय योजना याबाबत माहिती सांगून, कोविड लसीकरण जनजागृती केली, तसेच शेतावर जाऊन बीजप्रक्रिया माती परिक्षण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, चारा प्रक्रिया, पाणी व्यवस्थापन, फवारणी करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिली. याप्रसंगी जिंती गावाचे उपसरपंच दादासो भिमराव रणवरे, पांडुरंग आण्णा लोखंडे ( सदस्य), सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत यशवंतराव रणवरे , प्रदिप रत्नसिंह रणवरे (सदस्य), राजेंद्र गोकुळ रूपनवर( प्रगतशील बागायतदार), शरद बबनराव रणवरे ( सदस्य), दिलीप गणपत रणवरे ( क्लार्क), मेघा संदीप रणवरे, माधुरी सचिन रणवरे, तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. व सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य ए.ए.दरंदले, कार्यक्रमाचे समन्वय प्रा.एम.आर.माने, प्रा.गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments