Breaking News

कोरोना संख्येत वाढ! फलटण तालुक्यात 119 कोरोना बाधित ; सर्वाधिक विडणी - पाडेगाव प्रत्येकी 9

Corona numbers increase! 119 corona affected in Phaltan taluka; Most Vidni - Padegaon 9 each

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 22 जुलै 2021  - आज दि. 22 जुलै 2021 रोजी  जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 119 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये शहरात 2  व्यक्ती तर ग्रामीण भागात 117 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक विडणी - पाडेगाव येथे प्रत्येकी 9 रुग्ण सापडले आहेत.   कोरोना बधितांच्या संख्येने  पुन्हा एकदा शंभरी पार करून 119 आकडा गाठला आहे.  कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब चिंताजनक आहे.  नागरिकांनी  सावधान झाले पाहिजे. आणि कंपल्सरी मास्कचा वापर  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. 

    आज दि. 22 जुलै  2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 119 बाधित आहेत. 119 बाधित चाचण्यांमध्ये 70 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 49 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 2 तर ग्रामीण भागात 117 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात विडणी 9, पाडेगाव 9, निंबळक 7,  तरडफ 6, खडकी 6,  ढवळ1, कापशी 1, घाडगेमळा 1, खामगाव 1 , कोळकी 3,कोरेगाव 1, मुरुम 4, मुरुम ता बारामती 1, मिरढे 1, हिंगणगाव 4, पिंपरद 1,  शिंदेवाडी 2,  जिंती 1,  रावडी खु 5, शेरेशिंदेवाडी 1, सरडे 2, साखरवाडी 4,  सांगवी 4, सोमंथळी 4, वाठार निंबाळकर 1, तरडगाव 5, जावली 3, नांदल 2, आळजापूर 1, आसु 1, आदर्की 2, बरड 2, कांबळेश्वर 1, माझेरी 1, मुळीकवाडी 1, बिबी 1,  मिरगाव 4, निरगुडी 2, गिरवी 1, राजाळे 2, सासकल 2, सातारा ता सातारा 2, सुरवडी 1, वडले 2, अलगुडेवाडी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments