चिंता वाढली ! फलटण तालुक्यात 145 कोरोना बाधित ; सर्वाधिक मिरढे 27
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 24 जुलै 2021 - काल दि. 23 जुलै 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 145 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 10 रुग्ण तर ग्रामीण भागात 135 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक मिरढे येथे 27 रुग्ण तर त्या खालोखाल सुरवडी 12, कोळकी 9 रुग्ण सापडले आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर आज कोरोना बधितांच्या संख्येने पुन्हा एकदा शंभरी पार करत 145 आकडा गाठला आहे. कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असून, यामुळे चिंता वाढली आहे. नागरिकांनी तसेच प्रशासनाने सावधान झाले पाहिजे. नागरिकांनी कंपल्सरी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. अन्यथा पुन्हा रुग्ण वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.
काल दि. 23 जुलै 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 145 बाधित आहेत. 145 बाधित चाचण्यांमध्ये 75 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 70 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 10 तर ग्रामीण भागात 135 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात मिरढे 27, सुरवडी 12, कोळकी 9, आसु 7, शिंदेवाडी 6, पाडेगाव 5, ढवळ 1, ठाकुरकी 2, कोरेगाव 3, मिरगाव 4, हिंगणगाव 2, शिंदेमाळ 1, डोंबाळवाडी 4, वाठार निंबाळकर 1, वडले 1, तरडगाव 2, तरडफ 1, तडवळे 1, आळजापुर 4, आदर्की 1, गोखळी 2, सोमंथळी 1, अलगुडेवाडी 1, वडगाव ता माण 2, घाडगेवाडी 1, खडकी 1, ढवळ 4, कुरवली बु 2, मठाचीवाडी 1, मुंजवडी 1, भिलकटी 1, विठ्ठलवाडी 1, विडणी 4, हनुमंतवाडी 1, रावडी खुर्द 2, राजुरी 2, साखरवाडी 4, वाखरी 3, तावडी 1, जावली 2, आदर्की बु 1, कांबळेश्वर ता बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments