फलटण तालुक्यात 60 कोरोना बाधित ; सर्वाधिक साखरवाडी 6
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 15 जुलै 2021 - आज फलटण तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 60 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये शहरात 5 व्यक्ती तर ग्रामीण भागात 55 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक साखरवाडी येथे 6 रुग्ण सापडले आहेत.
आज दि. 15 जुलै 2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 60 बाधित आहेत. 60 बाधित चाचण्यांमध्ये 26 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 34 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 5 तर ग्रामीण भागात 55 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात साखरवाडी 6, तरडगाव 5, धुमाळवाडी 1, धुळदेव 1, कुरवली बु 1, मुळीकवाडी 2, मुरुम 3, मिरढे 1, विडणी 1, निंबळक 2, रावडी 1, रावडी खु 1, सासवड 2, सोमंथळी 2, सुरवडी 1, उपळवे 1, वाखरी 1, वाठार निंबाळकर 1, आळजापुर 1, आरडगाव 3, खांडज ता बारामती 2, पाटणेवाडी ता माळशिरस 1, आंधळी ता माण 1, ठाकुरकी 2, कापडगाव 3, कुसूर 1, मिरेवाडी (तरडगाव) 2, रावडी बु 2, सावंतवाडी 1, तावडी 1, वाणेवाडी ता बारामती 1, मोराळे ता बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments