चित्रनगरीचा टप्पानिहाय विकास करण्याबाबत नियोजन करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई - गोरेगाव येथील चित्रनगरीचा (फिल्मसिटी) पायाभूत विकास करण्यावर भर देताना चित्रनगरीचा टप्पानिहाय विकास करण्याबाबतचे नियोजन करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सह व्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख म्हणाले की, चित्रनगरी विकासाचा बृहत् आराखडा तयार करताना पायाभूत विकास याला प्राधान्य देण्यात यावे. चित्रनगरीचा विकास करताना विविध माध्यमासाठी असलेली आवश्यकता विचारात घेणे आवश्यक आहे. चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी पायाभूत सुविधाअंतर्गत कलागारे, चित्रीकरण स्थळे विकासासाठी स्वारस्य अभिव्यक्ती (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) कार्यवाही करण्यात यावी.
No comments