Breaking News

ग्रामीण स्वयंरोजगारासाठी दुग्धव्यवसाय हाच खरा पर्याय - लायन रणजीत निंबाळकर

विंचूर्णी (ता.फलटण) येथे फर्‍या स्वच्छ लसीकरण करताना डॉ.श्रीकांत मोहिते. समवेत ला.रणजित निंबाळकर, कु.नेहा शिंदे, सौ.उज्वला निंबाळकर व शेतकरी वर्ग
Dairy is the real option for rural self-employment - Lion Ranjit Nimbalkar

    विंचूर्णी  (गंधवार्ता वृत्तसेवा) -: दुग्ध व्यवसाय हा आता शेतीस पूरक व्यवसाय राहिलेला नसून ते एक स्वतंत्र उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी या व्यवसायाकडे त्यादृष्टीने लक्ष पुरवल्यास हा व्यवसाय शेतकर्‍यांसाठी निश्‍चितपणे आर्थिक परिवर्तन करणारा ठरेल, असे मत विंचूर्णी गावचे माजी सरपंच लायन रणजितभाऊ निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

    बारामती कृषी महाविद्यालय येथील चतुर्थ वर्षामध्ये शिक्षण घेत असलेली कु.नेहा जालींदर शिंदे हीने विंचूर्णी (ता.फलटण) येथे कृषी सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात लायन रणजित निंबाळकर बोलत होते. यावेळी लायनेस क्लबच्या अध्यक्षा तथा विंचूर्णीच्या ग्रामपंचायत सदस्या सौ.उज्वला निंबाळकर, माजी पशूप्रांत डॉ.श्रीकांत मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. 

    यावेळी सौ.उज्वला निंबाळकर म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिला वर्गाच्या अथक परिश्रमामुळेच आपल्या राज्यात दुधाचे विक्रमी उत्पादन होत असून दुग्ध व्यवसायामध्ये जिवंतपणा ठेवण्यासाठी महिला वर्गाचाच सिंहाचा वाटा आहे. 

    डॉ.श्रीकांत मोहिते म्हणाले, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर या आपल्या तालुक्यातील शालीन नेतृत्त्वाच्या जोडीने गोविंद दुग्ध उद्योगाच्या माध्यमातून उत्तम प्रशासन हाताळून दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रपंचामध्ये आर्थिक परिवर्तन घडवून आणल्यामुळेच तालुक्यात दुग्धव्यवसायाबाबत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ‘गोविंद’ च्या साथीने तालुक्यातील अनेक दुध उत्पादक शेतकरी आज आपली आर्थिक उन्नती साधत आहेत. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होत असल्याचे सांगून जनावरांचे रोग व प्रतिबंधक उपाययोजना याबाबतही डॉ.श्रीकांत मोहिते यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करुन वांज जनावरांची तपासणी व उपचार करुन फर्‍या लसीचे स्वच्छ लसीकरण जनावरांना केले.

    यावेळी कु.तेजस्विनी गांधी, निलम देशमुख, सुनिता कदम, शिला घाडगे, नवनाथ अहिवळे, महादेव मदने, कुंडलीक बागळकर यांच्यासह परिसरातील दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

No comments