विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते 31 रुग्णवाहिकांचे लोकार्पण
सातारा दि.16 (जिमाका): जिल्हा परिषदेने 14 व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या 31 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री बाळसाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार दिलासा - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळावी ही मागणी अनेक वर्षांची होती. शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 31 रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यामुळे रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार असून या रुग्णवाहिकांमुळे निश्चित ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
No comments