शासकीय योजनेतून उद्योगांसाठी अर्थसहाय्य
सातारा (जिमाका): राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील उद्योग व्यवसाय क्षेत्रात सुशिक्षीत बेरोजगार व्यक्तींना स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व खादी व ग्रामोद्योग मंडळ या दोन कार्यालयामार्फत केंद्र शासनाची पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या दोन योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रविंद्र बुचडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र प्लॉट नं.13 ए. एमआयडीसी, सातारा येथे किंवा 02162-244655 व खादी ग्रामोद्योग मंडळाच्या 02162-295084 येथे संपर्क साधावा.
No comments