आयुर हॉस्पिटलमध्ये कोव्हीड रुग्णांवर मोफत उपचार - दिगंबर आगवणे
Free treatment for Covid patients at Ayur Hospital - Digambar Agavane
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ जुलै - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेळोवेळी लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे जनसामान्य नागरिक हा आर्थिक अडचणीत सापडला आहे, त्यातच फलटण तालुक्यातील वाढती कोरोनाची संख्या पाहून आयुर उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे यांनी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
फलटण तालुक्यात कोरोना बधितांची संख्या वाढल्यानंतर, रुग्णांना बेडची कमतरता भासू लागली या पार्श्वभूमीवर दिगंबर आगवणे यांनी वाठार निंबाळकर येथे आयुर हॉस्पिटलची उभारणी केली होती. अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये त्यातच मागील दीड वर्षापासून लॉक डाऊन परिस्थिती असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे दिगंबर आगवणे यांनी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचे जाहीर करून नागरिकांना दिलासा दिला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी मो. 9614574141 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन दिगंबर आगवणे यांनी केले आहे.
No comments