तीन पानी जुगार ; ताथवडा येथील चौघांवर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ जुलै - मौजे ताथवडा ता. फलटण गावचे हद्दित पैशावर तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळल्या प्रकरणी ताथवडा येथील दोघेजण, बुध ता. खटाव येथील एकजण व निंभोरे ता. फलटण येथील एक जण अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २२ जुलै २०२१ रोजी ५.३० वा सुमारास मौजे ताथवडा ता. फलटण गावचे हद्दित सागर ढाब्याचे पाठीमागे झाडाचे आडोश्यास १) नागेश शरद शिंदे वय ३० वर्षे रा ताथवडा ता. फलटण जि. सातारा २) रियाज गनिम शेख वय ४४ वर्षे रा बुध ता. खटाव ३) तानाजी नारायण वाघ वय ४४ वर्षे रा. ताथवडा ता. फलटण ४) मोहन उत्तम मदने वय-३८ वर्षे रा. निंभारे ता फलटण जि. सातारा हे बेकायदा बिगर परवाना तिन पानी पत्याचा जुगार पैशावर स्वतःचे फायदया करीता खेळत असताना आढळून आले. त्यांच्याकडे रोख रक्कम एकुण ९,४०० /- रुपये व जुगाराचे साहित्य मिळुन आल्याने वरील चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहेत.
No comments