एमबीए आणि सीईटीबाबत मार्गदर्शन : १४ जुलै रोजी वेबिनार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - एमबीएच्या डीटीई सीईटीबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन (सुम्टा) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, ता. 14 रोजी सकाळी दहा वाजता वेबिनारचे आयोजन केले आहे. या वेबिनारमध्ये एमबीए आणि सीईटीबाबत मार्गदर्शन होणार असल्याची माहिती सुम्टाच्यावतीने देण्यात आली. हा वेबिनार वेबेक्स वर होणार असून या मिटींगचा क्रमांक 158 893 5023 आहे. या मिटींगचा पासवर्ड 1234 आहे. अशी माहिती सुम्टाचे सचिव प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी दिली.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात एमबीए ही पदव्युत्तर पदवी अत्यंत महत्वाची आणि गरजेची बनली आहे. नोकरीच्या आणि व्यवसायाच्या उच्चतम संधी एमबीए झाल्यामुळे मिळतात. प्रत्येक क्षेत्रात एमबीएचे ज्ञान अपरिहार्य बनले आहे. एमबीएच्या प्रवेशासाठी डीटीईची प्रवेश परिक्षा द्यावी लागते. या परिक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2021 ही असून एमबीए करु इच्छिणाऱ्या सर्वांनी ही परिक्षा देणे गरजेचे आहे. पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस बसलेले किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात.
आजच्या युगात पदवी असणे ही प्राथमिकता झाली असून एखाद्या विषयातील विशेष प्राविण्य मिळविणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी पदव्युत्तर पदवी मिळविणे अतिशय गरजेचे आहे. सध्या शिवाजी विद्यापीठाने एमबीए अभ्यासक्रमामध्ये अभिनव आणि गरजेचे बदल केले आहेत. एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या जगतात अमूल्य संधी मिळणार आहेत. भविष्यामध्ये कुशल मनुष्यबळाची निर्मिती आणि विकास व्हावा यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त असा तयार केला आहे.
एमबीएला प्रवेश घेऊ इच्छिनारे विद्यार्थी या मार्केटिंग, ह्यूमन रिसोर्स, फायनान्स, ऑपरेशन्स्, सिस्टिम्स, अॅग्रि बिझिनेस, इंटरनॅशनल बिझिनेस, आंत्र्यप्रुनरशिप, हॉस्पिटॅलिटी, बिझिनेश अॅनॅलिटिक्स, टेक्स्टाईल या विविध विषयांपैकी दोन विषय घेऊन एमबीए करु शकतात. एमबीएच्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिके आणि चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम सुरु झाली आहे. स्पर्धेच्या युगात स्वतःच्या कौशल्यावर प्रगती करणारे विद्यार्थी घडविणारे बदल या अभ्यासक्रमात केले आहेत.
यावर्षीच्या एमबीए प्रवेश परिक्षेसाठीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 17 जुलै 2021 ही आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रवेश परिक्षेचे अर्ज भरावेत. कारण ही प्रवेश परिक्षा दिली तरच शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या सवलतींसाठी विदयार्थी पात्र ठरतात. या परिक्षेमुळे फीमध्ये मिळणाऱ्या सवलती मिळणार आहेत तरी एमबीए करु इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश परिक्षेचे अर्ज भरावेत. ही सर्व माहिती देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि सुम्टाने वेबिनारचे आयोजन केले आहे. या वेबिनारला वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. एस. महाजन हे असणार आहेत तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर हे या वेबिनारचे अध्यक्ष असणार आहेत. प्रा. डॉ. सारंग भोला हे एमबीए अभ्यासक्रमाबद्दल आणि प्रा. डॉ. प्रविण जाधव हे एमबीए डीटीई सीईटी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या वेबिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन सुम्टाच्यावतीने करण्यात आले.
No comments