Breaking News

कोविडची लागण झाली असेल तर त्यानंतर किती दिवसांनी लस घ्यावी ?

If covid is infected, how many days after that should be vaccinated?

    कोविड लसी संदर्भात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी हे काही प्रश्न आहेत. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी डीडी न्यूज या वृत्तवाहिनीवरच्या विशेष कार्यक्रमात कोविड-19 लसीकरणाबाबत जनतेच्या मनातल्या विविध शंकांचे निरसन केले. 

कोविडची लागण झाली असेल तर त्यानंतर किती दिवसांनी लस घ्यावी ?

If covid is infected, how many days after that should be vaccinated?

    डॉ गुलेरिया : अद्ययावत मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट म्हटले आहे की कोविड-19 बाधित व्यक्ती, त्यातून बरे झाल्याच्या दिवसापासून तीन महिन्यांनी लस घेऊ शकते. यामुळे शरीराला अधिक बळकट रोग प्रतिकार क्षमता विकसित करण्यासाठी मदत होणार असून लसीचा परिणाम अधिक उत्तम होईल.   (https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1719972).

    भारतात आतापर्यंत आढळलेल्या आणि उत्परिवर्तन झालेल्या विषाणूच्या रुपावरही आपल्या लसी प्रभावी असल्याची ग्वाही डॉ पॉल आणि डॉ गुलेरिया या दोन्ही तज्ञांनी दिली. लस घेतल्यानंतर रोग प्रतिकार प्रणाली क्षीण होते किंवा लस घेतल्यानंतर मृत्यू होतो अशा प्रकारच्या सोशल मिडिया वरून पसरणाऱ्या अफवांमध्ये आणि लसी बाबत ग्रामीण तसेच दुर्गम भागात काही लोकांची असलेली चुकीची धारणा यामध्ये काहीही तथ्य नसून त्या निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लसीची मात्रा घेतल्यानंतर रक्ताची गुठळी होणे ही  सर्वसामान्य बाब आहे का ?

Is blood clotting common after taking the vaccine shots ?

 डॉ पॉल : अशा प्रकारची गुंतागुंत झाल्याची थोडी प्रकरणे समोर आली, विशेषकरून एस्ट्रा-झेनका लसीबाबत. युरोपमध्ये काही प्रमाणात त्यांच्या युवावर्गात, त्यांची जीवनशैली, शरीर आणि जनुकीय रचना यामुळे अशी प्रकरणे दिसून आली. मात्र मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की भारतात या डाटाचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर, रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या घटना अगदीच नगण्य असल्याचे आढळून आले, या घटना खूपच नगण्य असल्याने त्याबाबत चिंतेचे कारण नाही. आपल्या देशाच्या तुलनेत युरोपियन देशांमध्ये या गुंतागुंतीचे प्रमाण 30 पट जास्त आढळले आहे. 

    डॉ गुलेरिया : शस्त्रक्रियेनंतर रक्ताची गुठळी होण्याचे प्रमाण, अमेरिका आणि युरोपियन लोकांच्या तुलनेत भारतीयांमध्ये कमी आहे हे आधीच दिसून आले आहे. लसीमुळे निर्माण झालेला थ्रोम्बोसीस किंवा थ्रोम्बोसायटोपेनिया नावाचा हा साईड इफेक्ट अर्थात दुष्परिणाम भारतात अतिशय क्वचित असून युरोपपेक्षा अतिशय कमी प्रमाणात आढळतो. म्हणूनच याबाबत भीतीचे कारण नाही. यासाठी उपचारही उपलब्ध असून लवकर निदान झाल्यास ते उपयोगात आणता येतात.

No comments