Breaking News

पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे - पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले प्रशासनाला आदेश

Immediate panchnama of flood damage should be done - Guardian Minister Balasaheb Patil gave order to the administration
    सातारा दि. 24 (जिमाका) : तारळी धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तारळी नदीला पूर आला. या पुराची पाणी गावात शिरल्याने दुकानांची तसेच घरांची मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा. पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.
      पाली ता. कराड येथील पूर परिस्थितीची पाहणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. यावेळी ते बोलत होते. यापाहणी प्रसंगी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
      पूरामुळे पाली येथील पूलाचे नुकसान झाले आहे. या पुलाची तात्काळ दुरुस्ती करुन पूल वाहतुकीसाठी खुला करावा. गेल्या तीस ते पस्तीस वर्षात पाली येथे झालेला मोठा पाऊस आहे. पाटण तालुक्यातील विरगाव येथे भूस्खलन झालेल्या गावात बचावकार्य कोयनेच्या बॅकवॉटरमधुन सुरु करण्यात आले आहे. तसेच आंबेघर येथे एनडीआरएफची टीम आज सकाळी पोहोचली असून मदतकार्य सुरु केले आहे. कोयनाधरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये भूस्खलन झाले आहे. त्या गावामध्ये प्रशासनाबरोबर स्वयंसेवी संस्थाही काम करीत असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

No comments