ज्येष्ठ निर्भीड पत्रकार पद्मभूषण शेखर गुप्ता चिरमुले पुरस्काराने सन्मानित
सातारा - युनायटेड वेस्टर्न बँकेने स्थापन केलेल्या विमा महर्षी वा. ग. तथा अण्णासाहेब चिरमुले ट्रस्टतर्फे 1992 पासून प्रतिवर्षी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तीला चिरमुले पुरस्काराने सन्मानित केले जाते. सन 2019 चे चिरमुले पुरस्काराने नुकतेच देशातील नामवंत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण शेखर गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. अनील पाटील, समीर जोशी , डॉ.अच्युत गोडबोले, दिलीप पाठक या ट्रस्टच्या विश्वस्तांनी व पुरस्कार समितीचे संयोजक अरुण गोडबोले यांनी हे जाहीर केले .
पत्रकारितेच्या क्षेत्रात भीष्माचार्य मानले गेलेल्या शेखर गुप्ता यांची कारकीर्द इंडियन एक्सप्रेस या दैनिकात 19 वर्षे संपादक म्हणून बहरली .चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ऑपरेशन ब्लू स्टार ,चीनमधील तियान्मेन चौक ,बरलीन भिंतीचे कोसळणे अशा अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे त्यांचे वार्तांकन व विश्लेषण नावाजले गेले आहे. वॉक द टॉक, ऑफ द कफ, कट द क्लटर,नॅशनल इंटरेस्ट अशा त्यांच्या मुद्रित व दूरचित्रवाणी मालिका सदैव चर्चेत राहिल्या आहेत.त्यांनी स्थापन केलेला द प्रिंट हा डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म सध्या खूप लोकप्रिय आहे पद्मभूषण यासह अनेक गौरव आणि ते यापूर्वी सन्मानित झाले आहेत .
कोरोनामुळे पुरस्कार प्रदान कार्यक्रम जाहीररीत्या करता आला नाही मात्र, सातारकरांना धन्यवाद देतानाच परिस्थिती सुधारता सातारला येऊन सातारकरांसमोर आपले विचार मांडण्याचे मान्य केले आहे.
रुपये एक लाख व सन्मानपत्र असे चिरमुले पुरस्काराचे स्वरूप असून यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा, इन्फोसिस संस्थेचे संस्थापक नारायण मूर्ती, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. सि.रंगराजन , ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.अनिल काकोडकर ,ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज आदी मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
No comments