Breaking News

देवरुखवाडीला दिली पालकमंत्र्यांनी भेट, लोकांना भेटून शासन तुमच्या पाठीशी असल्याचे दिली ग्वाही

The Guardian Minister Balasaheb Patil visit to Devrukhwadi, met the people and testified that the government is with you

    सातारा दि.25 ( जिमाका ) वाई तालुक्यातील देवरुखवाडी (कोंडावळे) येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन जवळपास 14  घरांची हानी झाली, तसेच अनेक जनावरे देखील मृत्युमुखी पडून झालेल्या दुर्घटनेच्या घटनास्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली आणि लोकांना भेटून शासन तुमच्या पाठीशी असल्याचे दिली ग्वाही

  यावेळी  आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, वाई पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे- खराडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर  उपस्थित होते.

    देवरूखवाडी येथील धोकादायक घरांमधील व्यक्तींना गावच्या प्राथमिक शाळेत व मंदिरांमध्ये स्थलांतरित करून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी श्री.पाटील यांनी भेट दिली व लोकांना धीर दिला.

जांभळी येथील खचलेल्या जमिनीची केली पाहणी

    जांभळी ता. वाई येथील गाव ओढ्यानजीक अतिवृष्टीमुळे खचलेल्या जमिनीची पाहणी पालकमंत्री  बाळासाहेब पाटील यांनी केली. यावेळी आमदार मकरंद पाटील, गटविकास अधिकारी उदय कुसुरकर, डी.वाय.एस.पी शीतल जानवे/खराडे, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री झांजुर्णे, इतर प्रशासकीय अधिकारी व गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments