Breaking News

रौप्यपदक : मीराबाई चानूला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य

Silver medal: Mirabai Chanu won silver in weightlifting

   फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि. २४ जुलै - टोकियो ऑलिंपिक स्पर्धा मोठ्या दिमाखात सुरू झाल्या असून, भारताच्या मीराबाई चानू ने वेटलिफ्टिंग मध्ये रौप्यपदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. 

   वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 202 किलोग्रॅम वजन उचलून रौप्य पदक जिंकले. चीनच्या हौ झीहुईने 210 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या कांटिका विंडीने कांस्यपदक जिंकले.

   दरम्यान भारतीय नेमबाज सौरभ चौधरी 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.पुरुषांच्या हॉकीमध्ये भारताने न्यूझीलंडला 3-2 ने हरवून दमदार सुरुवात केली.

No comments