मेंढरे चराईस विरोध केल्याच्या कारणावरून झडकबाईचीवाडी येथील एकास मारहाण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २३ जुलै - तुझी मेंढरे रानातून हाकल, आमची जनावरे कोठे चारायची असे म्हटल्याच्या कारणावरून चिडून जाऊन, झडकबाईचीवाडी येथील एकास मारहाण केल्याप्रकरणी ताथवडे येथील नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 22 जुलै 2021 रोजी दुपारी 03:00 वा सुमारास संदीप केरबा मुळीक हे झडकबाईचीवाडी ता. फलटण गावचे हद्दीत जमीन गट नं. 183 मध्ये असलेल्या ऊसाच्या शेतात, भाऊ नवनाथ यांच्याबरोबर ऊसाला पाणी देत होते, त्यावेळी शेजारील पडीक असलेल्या जमिनीत दशरथ मानसिंग जाधव रा. ताथवडा ता. फलटण जि. सातारा हा त्याची मेंढरे घेवुन आला व तेथे चारु लागला म्हणुन, संदीप केरबा मुळीक त्यास म्हणाले की, मेंढरे रानातुन हाकल, आमची जनावरे कोठे चारायची असे म्हणालेच्या कारणावरून चिडुन निघुन गेला व रात्री 08:00 वाजण्याच्या सुमारास 1) दशरथ मानसिंग जाधव 2 ) विठ्ठल खाशाबा जाधव 3 ) चेतन शामराव जाधव, इतर सहा इसम सर्व रा. ताथवडा ता फलटण असे तीन मोटारसायकल वरुन येवुन बेकायदेशीर जमाव जमवून, विठ्ठल खाशाबा जाधव याने त्याचे हातातील लाकडी दांडक्याने संदीप केरबा मुळीक याच्या डाव्या पायाच्या पोटरीवर मारुन किरकोळ जखमी केले. नंतर दशरथ मानसिंग जाधव, चेतन शामराव जाधव व इतर सहा अनोळखी इसम यांनी संदीप केरबा मुळीक यास खाली पाडुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. भांडणे सोडविण्यास आलेल्या घरातील वैशाली मनोहर शिंदे, सुनिता नवनाथ मुळीक त्यांनाही सर्वांनी शिवीगाळ दमदाटी करुन तेथून पळून गेले असल्याची तक्रार संदीप केरबा मुळीक यांनी दिली आहे त्यानुषंगाने ताथवडे येथील दशरथ मानसिंग जाधव, विठ्ठल खाशाबा जाधव, चेतन शामराव जाधव यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहेत.
No comments