Breaking News

रूमची आतील कडी खोलून दोन मोबाईल हँडसेट लंपास

Open the inner door of the room and stolen two mobile handsets
     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे सस्तेवाडी ता.फलटण येथील सिमंट पाईप फॅक्टरी मधील बंद खोलीच्या दरवाज्याची आतील बाजूची कडी, अज्ञात चोरट्याने, आत हात घालून उघडली व खोलीमध्ये असणारे दोन मोबाईल हँडसेट अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ जुलै २०२१ रोजी रात्री ११.०० वा ते दिनांक १६ जुलै २०२१ रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान मौजे सस्तेवाडी ता.फलटण गावचे हददीत शरद आनंदाराव जाधव रा. चौधरवाडी ता.फलटण जि. सातारा यांच्या सिमंट पाईप फॅक्टरी मधील बंद खोलीच्या दरवाजाची कडी, अज्ञात चोरट्याने बाहेरुन हात आतमध्ये घालुन, कडी काढुन आत प्रवेश केला व  खोलीतील झोपलेल्या कामगाराच्या उशाजवळ ठेवलेले,  एक व्हीओ व एक रेडमी कंपनीचे मोबाईल सेट संमती शिवाय चोरुन नेले असल्याची फिर्याद शरद आनंदराव जाधव यांनी दिली आहे.

    अधिक तपास पोलीस हवालदार ए. एस. कर्णे करीत आहेत.

No comments