Breaking News

प्रिया मलिकला कुस्तीमध्ये सुवर्ण!


 Priya Malik wins gold in wrestling!

    गंधवार्ता वृत्तसेवा  दि. 25 जुलै - भारताची कुस्तीपटू प्रिया मलिकने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत यश संपादन करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हंगेरी इथे झालेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रिया मलिकने बेलारुसच्या कुस्तीपटूचा 5 -0 ने करून पराभव केला.

    75 किलो वजनी गटात प्रियाने बेलारुसच्या कुस्तीपटूचा 5 -0 ने दणदणीत पराभव केला. प्रिया व्यतिरिक्त आणखी दोन भारतीय पैलवानांनी सुवर्ण तर दोन कुस्तीगीरांनी कांस्यपदक जिंकले आहे.    प्रिया मलिकने 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्ये सुवर्ण पदक, 2019 मध्ये दिल्लीत झालेल्या 17व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि 2020 मध्ये पटना येथील नॅशनल कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच तिने 2020 मध्ये झालेल्या नॅशनल स्कूल गेम्समध्ये सुवर्ण जिंकले होते.

    प्रिया मलिकने मिळवलेल्या सुवर्ण यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियातून अनेकजण प्रियाचे कौतुक करत आहेत.

No comments