Breaking News

29 जुलै रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे पाच वाहनांचा जाहिर लिलाव

Public auction of five vehicles on July 29 at the Sub Regional Transport Office, Satara

    सातारा दि. 17 (जिमाका) : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या 5 वाहनांचा जाहिर ई - लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे दि. 29 जुलै 2021 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे, असे कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे.

            ई-लिलाव होणऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा. तहसिलदार, सातार. वाई व माण तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा यांच्या सुचना फलकावर जनेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छुक व्यक्तींना वाहनाची प्रत्यक्ष पाहणी सातारा येथील कार्यालयात करता येईल. जाहिर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 19 ते 23 जुलै या कालावधीत www.eauction.gov.in  या संकेतस्थळावर नांव नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध असेल, असेही  कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे.

No comments